Share

ऋषभ पंतने मोडला महेंद्रसिंग धोनीचा ‘हा’ मोठा विक्रम

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : ऋषभ पंतने (Rishabh Pant) कसोटी क्रिकेटमध्ये विकेटकीपिंगचा नवा विक्रम केला आहे. या फॉरमॅटमध्ये तो सर्वात जलद 100 झेल घेणारा भारतीय ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि ऋद्धिमान साहाच्या (Wriddhiman Saha)  नावावर होता. हा विक्रम दोघांच्या नावावर संयुक्तपणे होता. ऋषभ पंतने टेम्बा बवुमाला (Temba Bavuma) विकेटच्या मागे आपला 100 वा बळी बनवला.

धोनीला मागे टाकण्यासाठी पंतला या सामन्यापूर्वी 3 झेल हवे होते. तिसऱ्या दिवसाच्या खेळातच त्याने तीन झेल घेत हा विक्रम केला. हा आकडा गाठण्यासाठी पंतने 26 कसोटी सामने खेळले आहेत. धोनी आणि साहा यांनी ३६-३६ कसोटी सामने खेळले. किरण मोरेने यासाठी 39 कसोटी सामने घेतले.

दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने ग्लोव्हजमध्ये चार झेल घेतले. त्याने डीन एल्गर, विआन मुल्डर, टेम्बा बावुमा आणि कागिसो रबाडा यांचे झेल घेतले. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 197 धावांत ऑल आऊट झाला आणि टीमइंडियाने 130 धावांची मोठी आघाडी घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!