मुंबई : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गैरहजरीवरुन मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. हिवाळी अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतील, असं सुरुवातीपासून सांगण्यात आले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील स्टँपवर लिहून देऊ का असे म्हणत मुख्यमंत्री अधिवेशनाला येणारच असा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात संपूर्ण अधिवेशन उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. यावर अधिवेशनाची सांगता झाल्यावर अजित पवार यांनी उत्तर दिले.
‘या अधिवेशनाला शेवटपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती होते. सुरुवातीला अधिवेशन सुरू होण्याआधी मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन खालच्या आणि वरच्या सभागृहाची पाहणी केली. त्यांचे अधिवेशनावर फार बारकाईने लक्ष होते. त्यांनी त्याबाबत सूचना देखील केल्या होत्या. या काळात ज्या 2 कॅबिनेट झाल्या त्यालाही ते व्हीसीद्वारे हजर होते’, असे अजित पवार म्हणाले आहे. यावरुन आता मनसे नेते संदिप देशपांडे यांनी ट्विट करत अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. ‘मुख्यमंत्रिपदाचा हंगामी का होईना ताबा मिळाला त्यासाठी शुभेच्छा’ असे संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
‘महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील बनावट स्टॅम्प पेपर बहुधा उपमुख्यमंत्र्यांकडे आला असावा, नाहीतर तोंडावर आपटले नसते. असो मुख्यमंत्रिपदाचा हंगामी का होईना ताबा मिळाला त्यासाठी शुभेच्छा’, असे संदिप देशपांडे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भ्रष्टाचाराच्या दृष्टीने विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर केले’, भाजपचा आरोप
- ‘कुणावर हल्ला घडवून आणण्याची वृत्ती वाळव्याच्या पाटलांची नाही’, राऊतांकडून जयंत पाटलांची पाठराखण
- “भाजप पुढाऱ्यांच्या डोक्याचा केमिकल लोचा”, संजय राऊतांची खोचक टीका
- “विरोधी पक्ष मांजरीचा वंशज असल्याने…” ; शिवसेनेची खोचक टीका
- ‘श्रीधर नाईकापासून, रमेश गोवेकरांपर्यंत ज्या हत्या झाल्या त्याच मालिकेत संतोष परबांनाही बसवायचे होते’


