Share

‘पवारसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय देशाचा आणि राज्याचा इतिहास लिहिता येणार नाही’

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्यसभा खासदार शरद पवार(Sharad Pawar) यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्यासोबतच आज देशातील विविध राजकीय पक्षातील नेत्यांनीही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना अजित पवारांचा कंठ दाटून आला होता. पवारांबद्दल भरभरून बोलताना एका क्षणी अजित पवार अत्यंत भावूक झाले होते. मला फार काही सूचत नाही, शब्द बाहेर पडत नाही, अशी भावना व्यक्त करून आपले भाषण थांबवले. त्यामुळे उपस्थित कार्यकर्तेही हारावून गेले होते. पवारसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय देशाचा आणि राज्याचा इतिहास लिहिता येणार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.

पवार साहेब हे साहित्यिक, सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक विश्वात आख्यायिका बनून राहिले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला हिमालयाची उंची आणि सह्याद्रीचा भक्कमपणा आहे. अहोरात्र कष्ट करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. सर्वांकडे बारकाईने लक्ष देणे, सर्वांना संस्कार देणे, सामाजिक बांधिलकी देण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी केवळ आम्हालाच नाही तर लाखो तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी बळ दिलं, प्रेरणा दिली. तुमच्या माझ्या सारखे लाखो तरुण साहेबांकडे आधारवड म्हणून बघतात, असे बोलताच अजित पवारांचा कंठ दाटून आल्याचे पाहायला मिळाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!