Share

जितेंद्र आव्हाडांचा विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न; केली महत्वाची घोषणा

Published On: 

मुंबई : आरोग्य भरती घोटाळा, पेपर फुटी प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी आणि विद्यार्थ्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली होती. त्यानंतर आता राज्यातील म्हाडाच्या परिक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने पुन्हा एकदा राज्य सरकारचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. म्हाडा परिक्षा रद्द झाली असल्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री 2 वाजता केली आहे.

राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे संतप्त असणारे विद्यार्थी आणखीन क्रोधित झाले आहेत. मात्र, हा पेपर फुटला जाणार असल्याने ही परीक्षा रद्द करण्यत आल्याचा दावा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. याबाबत पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

म्हाडा परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल जितेंद्र आव्हाडांनी माफी मागत परीक्षेची फी परत करण्याची घोषणा केली आहे. या पेपर फुटी प्रकरणामध्ये 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, पोलिसांनी त्या टोळीचा पर्दाफाश केला, अशी माहिती जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे. भविष्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात जी टोळी कार्यरत आहे, ती उध्वस्त करायला लागेल, यात पेपरफुटी नाही तर गोपनियतेचा भंग झाला आहे. असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. शनिवारी रात्री पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले, त्यांच्या संभाषणात पेपरफुटीचा उल्लेख होता.

महाराष्ट्रमधील सर्व दलाल एकच आहेत, खाजगी संस्थेकडून हा प्रकार झाला, त्यामुळे यापुढे म्हाडा परीक्षा घेणार, खासगी संस्थेकडे देणार नाही अशीही माहिती त्यांनी दिली. ज्यांच्याकडून फी घेतली आहे, त्यांची फी म्हाडा परत करणार आहे. काही नालायक लोकांना थारा देऊ नये. ही परीक्षा झाली असती तर काहींवर अन्याय झाला असता. विद्यार्थ्यांचे हीत जवळचे आहे त्यामुळे मोठे रॅकेट पकडायला डिपार्टमेंट मागे लागले आहे, तसेच वशिल्यासाठी काही लोक मंत्रालयात येतात, मागच्या सरकारवेळीही एमपीएसीचा पेपर फुटला, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!