Share

‘आव्हाडसाहेब, जमत नसेल तर मंत्रिपद सोडा, कुंपणच शेत खात असेल तर….’

Published On: 

पुणे : म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शनिवारी मध्यरात्री माहिती दिली आहे. राज्याच्या राजकारणात यावरुन मोठा गदारोळ सुरु झाला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

या मुद्द्यावरुन संभाजी ब्रिगेडने देखील महाविकास आघाडीवर संताप व्यक्त केला आहे. म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शनिवारी रात्री माहिती दिली. पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यात तिघांना अटक झाली आहे.

म्हाडाची परिक्षा मध्यरात्री अचानक रद्द करण्यात आली. या परिक्षा अचानक रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली आहे. विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तुमचेच लोक पेपर फोडत असतील आणि प्रत्येक पदावर लाखो रुपयांचा बाजार त्या ठिकाणी फुटत असेल याला फक्त मंत्री आणि सरकारच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केला आहे.

तुम्हाला व्यवस्थित परिक्षा घेता येत नसतील. ते व्यवस्थित कंडक्ट करता येत नसेल, तर राजीनामा द्या आणि घरी बसा. तुम्ही फक्त मुंबईचे मंत्री आहात का? विद्यार्थ्यांच्या भावनाशी खेळू नका. जागे व्हा. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब, जमत नसेल तर… मंत्रिपद सोडा कुंपणच शेत खात असेल तर बोलणार कोणाला, असेही संतोष शिंदे म्हणाले आहेत.

https://www.facebook.com/santosh.shinde.33449138/videos/491499962217958/

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!