Share

म्हाडा पेपरफुटीची सीबीआय चौकशी करा; फडणवीसांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : म्हाडाकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा अचानक रद्द करण्यात आली यामुळे परीक्षार्थीं संतापले आहेत. ‘काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली’ असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा ट्विटरला व्हिडीओ शेअर करत सांगितले. यावरून भाजपच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केल्या जात आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी देखील या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.

भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे? आरोग्य भरती परीक्षेचा घोळ! पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत, आता म्हाडाच्या परीक्षेतही तोच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ! सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही! भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे? , असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तरी करू नका! दोषींवर कठोर कारवाई कराच, पण सरकार म्हणून याची कुणी जबाबदारी घेणार की नाही? असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!