🕒 1 min read
कोल्हापूर : कोल्हापूर शहर व जिल्ह्यात सलग शुक्रवारी तिसऱ्या दिवशी तुफान पाऊस सुरू होता. यामुळे जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह अन्य सर्व नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. जिल्ह्यातील महापूराच्या परिस्थितीमुळे शेकडो कुटुंबांना जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले असून अद्यापही बचावकार्य सुरू आहे. वाहतूक तसेच नागरी जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून तासागणिक वाढणारा पाऊस आणि नद्यांची पातळी यामुळे प्रशासनाचे आणि नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.
या पार्श्वभूमीवर भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्याशी चर्चा केली होती. तसेच नौदलाच्या मदतीची केली विनंती होती. याला बिपीन रावत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पूरग्रस्त जिल्ह्यात भागात सैन्यदलाच्या तुकड्या दाखल झाल्यात. रत्नागिरी, कोल्हापूरमधील शिरोळ, सांगलीतील पलूस येथे सैन्यदलाची तुकडी पोहाचली असून त्यांनी बचावकार्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर अमरावती व नागपूर येथील परिस्थितीवर सैन्यदलाचे लक्ष असून हे जिल्हे सध्या निरीक्षणाखाली आहेत.
काल मी लिहिलेल्या पत्राला चीफ ऑफ स्टाफ व डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स यांचे अतिशय सकारात्मक उत्तर आले असून. खालील पूरबाधित जिल्ह्यांमध्ये सैन्यदलाच्या तुकड्या दाखल झाल्या आहेत व त्यांनी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु केले आहे.
…— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 24, 2021
कोल्हापुरात आता पावसाने उघडीप घेतली आहे. पण हवामान विभागाने कोल्हापूरसाठी आज आणि उद्या (दि.२५ जुलै) साठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पातळी आज सकाळी ८ वाजता ५५ फूट ६ इंचांपर्यंत पोहोचली होती. पंचगंगा नदीची पाणी पातळी संथगतीने कमी होतेय. पण अजूनही साचलेले पाणी कमी झालेला नाही. त्यामुळे जनजीवन ठप्प आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांना घर न सोडण्याचीही सूचना अजित पवारांनीच दिली असावी’
- ‘इतका वेगवान मुख्यमंत्री देशाच्या इतिहासातही झाला नसेल!’, भाजपचा टोला
- मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला देणार भेट
- ‘संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे अनिल परब हे पळकुटे मंत्री’
- दोन मुलांचे धोरण देशभरात राबवणार का?, केंद्राने संसदेत दिले ‘हे’ उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
