पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे कार्यकर्ता मिळावा घेत आहेत. पिंपरी-चिंचवड नंतर पुण्यात कार्यकर्ता मेळावा राऊत यांनी घेतला असून यावेळी विरोधकांवर सडकून हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना देखील अप्रत्यक्षरीत्या लक्ष्य केलं.
शिवसेना आणि राणे हा वाद मागील महिन्यात चांगलाच उफाळून आला होता. भाजप आणि शिवसेनेमध्ये यावरून जोरदार राडा देखील झाला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेमुळे राणे यांना अटक देखील करण्यात आली होती. याबाबत संजय राऊत यांनी पुण्यातील मेळाव्यात बोलत राणेंना पुन्हा डिवचलं आहे.
‘सध्या आपलं सर्व काही व्यवस्थित चाललं आहे. आपली व्यवस्था उत्तम चालत असल्यामुळे विरोधी पक्षाला त्रास सुरू झाला आहे, असे म्हणताच उपस्थित कार्यकर्त्यांमधून कोंबडी चोर अशी प्रतिक्रिया आली. त्यावर संजय राऊत म्हणाले की, अटक झाली ना. यावर उपस्थितांमधील एक जण बोलला जेवत्या ताटावरून उठवलं. यावर, ‘अजून कशावरून उठवायचा ते सांगा तिथूनही उठवतो. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका शिवसेना हि आग आहे,’ असं भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून धोनीने मानलेल्या भावाला म्हणजेच ब्राव्होला संघाबाहेर ठेवलं
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- पहाटेचा कार्यक्रम आता विसरा; अजित पवारांचेही उद्धव ठाकरे हेच नेते – संजय राऊत
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- ‘घोडा लावायचा तेव्हा लावतो, लोकं माझ्याकडून घोडे लावण्याचे धडे घेतात; त्यात मी एक्स्पर्ट’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

