Share

…म्हणून धोनीने मानलेल्या भावाला म्हणजेच ब्राव्होला संघाबाहेर ठेवलं

Published On: 

दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या सत्राची धमाकेदार सुरुवात झाली आहे. भारतातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा १४ वा हंगाम अर्ध्यावर स्थगित करण्यात आला होता. आता हा हंगाम युएईमध्ये पूर्ण केला जात आहे. जसं जशी ही स्पर्धा पुढे जात आहे तस तशी यंदा विजयी कोण होणार याची उत्सुकता वाढली आहे.

आज रविवार असल्याने दोन सामने खेळवले जात आहे. यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरु आहे. चेन्नई गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असून कोलकाता चौथ्या स्थानी आहे. पहिल्या चार स्थानांमध्ये कायम राहून स्पर्धेत आव्हान टिकवण्यासाठी यंदा चांगलीच रस्सीखेच होणार असून कोलकात्याच्या संघाला विजय महत्वाचा आहे.

दरम्यान, आज चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंग धोनी याने आपल्या संघात काही बदल केला आहे. धोनीने संघातील आवडत्या खेळाडूंपैकी एक आणि गेले कित्येक सत्र चेन्नईसाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ड्वेन ब्राव्होला आज संघाबाहेर ठेवलं. चांगल्या लयीत असलेल्या ब्राव्होला संघाबाहेर ठेवण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. धोनीने आरसीबीविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर ब्राव्होला ‘भाऊ’ असे म्हटले होते. आता त्यालाच बाहेर ठेवण्याबाबत खुद्द धोनीने स्पष्टीकरण दिलं आहे.

नाणेफेकीनंतर धोनी म्हणाला, ‘आम्ही या सामन्यासाठी संघात बदल केला आहे. ब्राव्होच्या जागी करनला संधी देण्यात आली आहे. सीपीएल दरम्यान ब्राव्होला स्नायूंचा ताण होता. त्यामुळे त्याची दुखापत आणखी वाढू नये, अशी आमची इच्छा होती. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. संघात अनुभवी खेळाडू असणे महत्त्वाचे आहे.’ दरम्यान, कोलकात्याने चेन्नईला 172 धावांचे लक्ष्य दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!