Share

औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी महापौर विकास जैन व माजी नगरसेविका अल्पा जैन यांची कन्या ऊर्जा जैन ही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. देशातून तिने ५१९ वा क्रमांक मिळवला असून, या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. उर्जासोबतच शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील येथील रहिवासी अनिकेत कुलकर्णी यांनीदेखील यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. शहरात दोघांवरही कौतुकाचा वर्षाव होतांना दिसून येत आहे.

औरंगाबाद येथील रहिवासी असलेली ऊर्जा विकास जैन हिचे शालेय शिक्षण नाथव्हॅलीमध्ये झाले आहे. मुंबईतील सोफिया महाविद्यालयात तिने अर्थशास्त्र विषयातून कला शाखेची पदवी घेतली. त्यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तिने अर्थशास्त्र हा विषय घेतला. ऑक्टोबर २०२० मध्ये लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा दिली. शुक्रवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. तिसऱ्या प्रयत्नात ऊर्जा जैन हिने हे यश मिळवले आहे. देशातून तिने ५१९ वा क्रमांक पटकवला आहे.

शिवसेनेचे माजी महापौर तथा वेदांतनगर वॉर्डाचे माजी नगरसेवक विकास जैन व माजी नगरसेविका अल्पा जैन यांची ती कन्या आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतूक होत आहे. शिवसेनेच्या वतीने रोहयो मंत्री संदिपान भुमरे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना प्रवक्ते आमदार अंबादास दानवे यांनी अनिकेत कुलकर्णीचा सत्कार करून त्याचे अभिनंदन केले. तसेच या यशामुळे औरंगाबाद शहराच्या इतिहासात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला असून अनिकेत कुलकर्णी, उर्जा जैन यांचे कौतुक करून पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!