Share

‘घोडा लावायचा तेव्हा लावतो, लोकं माझ्याकडून घोडे लावण्याचे धडे घेतात; त्यात मी एक्स्पर्ट’

Published On: 

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे कार्यकर्ता मिळावा घेत आहेत. पिंपरी-चिंचवड नंतर पुण्यात कार्यकर्ता मेळावा राऊत यांनी घेतला असून यावेळी विरोधकांवर सडकून हल्लाबोल केला. मात्र, उस्फुर्ततेच्या भरात राऊत यांनी काही आक्षेपार्ह विधान देखील केल्याचे आता समोर येत आहे.

‘बाळासाहेब नेहमी सांगायचे, माझ्या पक्षामध्ये सर्वोच्च पद कुठलं असेल तर शिवसैनिक पद हे सर्वात मोठं असेल. म्हणून समोर बसलेले, मगाशी आपण म्हटलात ना, भाकरी फिरवायचे, घोडा फिरवायचा, घोड्यावर बसवायचंय. शिवसेना हा रेसचा घोडा आहे हे लक्षात घ्या,’ असं राऊत यांनी म्हटलं. यावर एका कार्यकर्त्याने लावायला कायम तयार असतो, असं म्हटलं.

यावर राऊत म्हणाले, ‘आपण लावायचं तेव्हा लावतोना घोडा. त्याबाबत मला सांगायला नको. त्यामध्ये मी एक्सपर्ट आहे. लोकं माझ्याकडून घोडे लावण्याचे धडे घेतात. मी सगळ्या प्रकारचे घोडे वापरलेले आहेत. कळलं का? मी घोडे लावले, पण घोड्यावर बसलो नाही,’ असं राऊत यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला तर काहींनी घोषणाबाजी देखील केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!