Share

पहाटेचा कार्यक्रम आता विसरा; अजित पवारांचेही उद्धव ठाकरे हेच नेते – संजय राऊत

Published On: 

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे कार्यकर्ता मिळावा घेत आहेत. पिंपरी-चिंचवड नंतर पुण्यात कार्यकर्ता मेळावा राऊत यांनी घेतला असून यावेळी विरोधकांवर सडकून हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी ‘पहाटेच्या शपथीविधीवर’ देखील भाष्य केलं.

‘पहाटेचा कार्यक्रम आता विसरला पाहिजे. आम्हाला अजित पवारांविषयी आम्हाला आदर आहे. उद्धव ठाकरे हे अजित पवारांचेही नेते आहेत, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. पुढे त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पवारांवर असलेल्या नाराजीवरून देखील अजित पवार यांना महत्वाचं आवाहन केलं आहे.

‘तुम्ही पुण्यातल्या आमच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करू नका. कारण शिवसैनिक तापला की माझी सटकली म्हणून तो रस्त्यावर उतरतो, त्यामुळे त्याची काळजी घ्या,’ असं म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या अजित पवार यांना इशारा दिला आहे. यासोबतच, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावा, महापौर आपलाच झाला पाहिजे, अशा सूचना देखील संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. यामुळे अजित पवार यांच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन्ही महापालिकेवर शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!