🕒 1 min read
मुंबई: वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हटले गेलेल्या ख्रिस गेलचा आगामी टी-20 क्रिकेट वर्ल्ड मध्ये समावेश करण्यात आला आहे. गेलनं वयाच्या 41 व्या वर्षी 18 महिन्यानंतर टीममध्ये पुनरागमन केलं आहे. भारतामध्ये यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपची तयारी वेस्ट इंडिजनं सुरू केली आहे.
गेलंनं 2019 साली इंग्लंड विरुद्ध शेवटची टी-20 मॅच खेळली होती. त्या मॅचमध्ये त्याने चार बॉलमध्ये फक्त पाच रन केले होते. त्यानंतर त्याला टीममधून वगळण्यात आलं. मागील अठरा महिन्यांमध्ये गेलनं वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. या स्पर्धेत त्याने अनेक अर्धशतकं आणि शतकं झळकावली आहेत.
दरम्यान, ख्रिस गेल वेस्ट इंडिज संघाकडून ट्वेंटी-20 सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 व वन डे मालिकेसाठी विंडीज संघांची शनिवारी घोषणा करण्यात आली. दोन वर्षांनंतर गेल विंडीजच्या ट्वेंटी-20 संघाकडून खेळणार आहे. गेलच्या या समावेशामुळे तो यंदा भारतात ऑक्टोबर-नोब्हेंबर महिन्यात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्येही फटकेबाजी करताना दिसेल, अशी शक्यता बळावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांच्या नावाखाली कोणाचे ‘पोषण’? ५० किलोच्या गोणीत फक्त ३५ किलो तांदूळ!
- दारू विकणाऱ्यानेच दिली दारू विक्रीची तक्रार, मग काय? खाल्ला मार!
- सावधान! ‘या’ रुग्णांची माहिती लपवल्यास होणार २ वर्षांचा कारावास
- याजसाठी केला होता अट्टाहास, पण शेवट वाईट झाला! चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश निष्फळ?
- खाम स्वच्छता मोहीम,नव्या ‘स्मार्ट’ सीईओंची अनुपस्थिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
