Share

मद्यविक्रीतून ठाकरे सरकार मालामाल, रेकॉर्डब्रेक उत्पन्न!

Published On: 

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे राज्याच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाले होते. आता मात्र या आर्थिक कोंडीतून सावरण्यास सुरुवात झाली आहे. कारण राज्यातील उध्दव ठाकरे सरकार २०२१ – २२ या आर्थिक वर्षात मद्यविक्रीतून मालामाल झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने २०२१-२२ मध्ये मागील एकूण तीन आर्थिक वर्षात सर्वाधिक महसूल गोळा केल्याचा विक्रम केला आहे. यामुळेच आता राज्याच्या तिजोरीला मोठा हातभार लागला आहे.

कोरोना आणि लॉकडाऊन काळात राज्य सरकारला फार मोठा निधी खर्च करावा लागला होता. कोरोना काळ, त्या दरम्यान आलेली नैसर्गिक आपत्ती यामुळे फार मोठ्या प्रमाणावर राज्याच्या टिजिरीवर ताण पडला होता. या काळात उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे सरकारचे महसुली उत्पन्न ही बंद पडले होते. यात विशेषतः पेट्रोल डिझेल वरील कर आणि मद्यविक्रीतील महसूल याचा समावेश होता. याच मद्यविक्रीत आता २०२०-२१ आर्थिक वर्षाच्या तुलनेत महाराष्ट्रात मोठी वाढ झाली असून २०२१ – २२ या आर्थिक वर्षातील वाढ १७ टक्क्यांची आहे.

महाराष्ट्रात २०१९-२० या वर्षात २ हजार १५७ लाख लीटर दारुविक्री झाली. यानंतर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे २०२०-२१ या वर्षात मद्यविक्रीत मोठी घट झाली होती. आता २०२१-२२ या वर्षी पुहा एकदा मोठी वाढ झाली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्यात तब्बल २ हजार ३५८ लाख लीटर दारूची विक्री झाली आहे.भारतीय बनावटीच्या विदेशी दारुसोबतच बिअर, देशी दारु आणि वाईन विक्रीतही मोठी वाढ झाली. गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२१-२२ मध्ये बिअरच्या विक्रीत १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१९-२० मध्ये २२ टक्क्यांची घट झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!