Share

वाळू माफियांनी खड्डे खोदले! कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा बुडून मृत्यू

Published On: 

बीड : कपडे धुण्यासाठी गोदावरीच्या पात्रात गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील शनीचे राक्षसभुवन येथे नेहा धर्मराज कोरडे (वय ९) व अमृता धर्मराज कोरडे (वय ८) अशी मृत मुलींची नावे आहेत.

नेहा व अमृता या बहिणी शनिवारी नेहमीप्रमाणे गोदापात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. नदीच्या पात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात पाय घसरून त्या पडल्या. पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. गोदापात्रातील वाळूच्या मोठ्या खड्ड्याने या बहिणींचा जीव घेतल्याचा आरोप केला जात आहे. चकलांबा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मुलींचे मृतदेह पाण्याबरोबर काढले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर दोन्ही मुलींचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

‘वाळू माफियांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात फक्त तीन ठिकाणी वाळूचा ठेका देण्यात आलेला आहे. इतर ठिकाणी अनाधिकृतपणे वाळूचा उपसा होत आहे. वाळू कोण उपसतयं याच्या मागील मास्टरमाईंड कोण आहे याची सगळी माहिती हद्दीतील महसुल आणि पोलीस प्रशासनाला असते. मात्र, केवळ लाचखोरीमुळे वाळू माफीयांवर कारवाई होत नाही. राक्षसभुवन हद्दीत दोन मुलींचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यु झाला. ज्या खड्डयामध्ये ज्या मुलींचा मृत्यू झाला ते खड्डे वाळू माफीयांनी खोदून ठेवले होते. याप्रकरणी महसूल प्रशासनासह वाळू माफीयांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!