मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. तसंच, भाजपचे नेते व नारायण राणेंचे पुत्र नितेश व निलेश राणे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. नितेश राणे यांनी राऊत यांना लावारीस म्हणत त्यांना त्याचा बाप कोण हेच माहित नसल्याची जहरी टीका केली होती. यावरून राऊत यांनी खडेबोल सुनावले आहेत.
‘नारायण राणे यांच्या राजकीय कारकीर्दीचे सगळ्यात जास्त नुकसान त्यांच्या मुलांनी केले आहे. टीका करणे व स्वीकारणे ही लोकशाहीची परंपरा आहे. महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण ठाकऱ्यांपासून पवारापर्यंत, राहुल गांधींपासून मोदींपर्यंत सगळ्यांचे आईबाप काढणाऱ्या राणेंच्या मुलांनी त्यांच्या पिताश्रींचे नुकसान केले. एक दिवस हीच वेळ ते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्यावर आणतील,’ असा खोचक टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
राणे यांची मुले इतरांचे बाप ऊठसूट जाहीरपणे काढतात. ‘तुम्ही बिनबापाचे आहात काय?’ असा प्रश्न त्यांना एक दिवस भाजपचे लोकच विचारतील तेव्हा ते काय उत्तर देतील? महाराष्ट्राच्या राजकारणातील हे गढूळ प्रवाह थांबले नाहीत तर राज्याची बदनामी होईल. उद्धव ठाकरे व इतरांवर धोरणात्मक टीका करणे समजू शकतो. तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, पण राणे व त्यांची दोन्ही मुले राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या ठाकरे यांच्याविषयी जी भाषा वापरतात तो भाजपच्या नव्या संस्कृतीचा उदय आहे! राणे व त्यांच्या मुलांनी काँग्रेस पक्षात असताना नरेंद्र मोदी, वीर सावरकर यांच्याविषयी याच असभ्य भाषेचा वापर केला होता. घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींचा एकेरी पद्धतीने अपमानास्पद उल्लेख करण्याचा अधिकार राणे व त्यांच्या मुलांना कोणी दिला?
राणे महाराष्ट्रात येऊन ज्या प्रकारची विधाने करीत आहेत तो केंद्रीय मंत्री म्हणून मर्यादांचा, परंपरांचा भंग आहे व पंतप्रधान मोदी यांनी वेळीच दखल घेतली नाही तर त्याचे फार मोठे परिणाम भाजपला भोगावे लागतील. महाराष्ट्रातील चार शहाण्यांनी पुढे येऊन राज्यातील पेंढाऱ्यांचे कान उपटावेत, अन्यथा राज्याची घडी विस्कटेल, असा ‘रोखठोक’ इशाराही राऊतांनी भाजपला दिला आहे.
नितेश राणे काय म्हणाले होते?
शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे सामनातून भाजप तसेच राणेंवर निशाना साधत. त्यावरून दि.२६ ऑगस्ट रोजी नितेश राणे यांनी संजय राऊत यांना ट्वीट करत सडेतोड प्रतिउत्तर दिले. ‘कोण राणे म्हणणारे दोन दिवसांपासून सामनातून अग्रलेख लिहून आपण मुख्यमंत्री ठाकरेच्या मिठाला जागतो. आणि पवारांचा लोंबता नाही हे दाखवत आहे. स्व.माँ साहेबांबद्दल याच नालायकाने काय लिहिले होते हे लोकप्रभामध्ये वाचावे असा टोला लगावत ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे हेच माहित नसेल त्याला काय किंमत द्यायची अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पंतप्रधानांनी शपथ घेतली की संसद आत्महत्या करते’, पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य
- सूर्याला संधी देण्याची हीच वेळ : दिलीप वेंगसरकर
- कोहलीने लीड्स कसोटीतील पराभवाचे खापर फलंदाजीवर फोडले, म्हणाला..
- ९१ धावांवर बाद होताच पुजाराने तोडला राहुल द्रविडचा अनोखा विक्रम
- मैदानात घुसलेल्या ‘त्या’ व्यक्तीवर आजीवन बंदी; इंग्लिश काउंटी यॉर्कशायरने केली मोठी कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

