Share

‘संजय राऊत बोगस माणूस, त्याचा जिथे दिसेल तिथे ‘करेक्ट’ कार्यक्रम करूत’, निलेश राणेंचा इशारा

Published On: 

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राणे कुटुंबीयांचे सुरू झालेले शाब्दिक युद्ध शमताना दिसत नाही. भाजप नेते, माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्यु्त्तर दिले आहे. संजय राऊत जेथे दिसतील तेथे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू, असा इशारा निलेश राणे यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

संजय राऊत यांनी नाशिकच्या दौऱ्यात एका सभेत त्यांनी अजून एखादा करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा दिला होता. त्यावर निलेश राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले, करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय? संजय राऊत बोगस माणूस आहे. त्याला कवडीचीही किंमत देत नाही. जिथं दिसेल तिथं संजय राऊतांचा आम्हीच करेक्ट कार्यक्रम करू, असा इशारा निलेश राणे यांनी दिला.

‘शिवसेनेच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. जन आशीर्वाद यात्रा आम्ही पूर्ण करणार आहोच. शिवसेनेकडे आता आचार-विचार राहिले नाहीत. शिवसेना आता अडवा अडवीची काम करत आहे. आम्ही राऊतांना काडीची किंमत देत नाही. संजय राऊत यांनी एकदा आमच्या गर्दीत उभ रहावं आणि मग साहेबांचे विचार काय आहेत ते बघावे’ असेही नीलेश राणे म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावण्यात आली. असे असले तरी ते मात्र काही करू शकले नाहीत. एक दिवस तरी त्यांना ठेवायचे होते, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!