Share

‘वेतनाअभावी एसटी कर्मचाऱ्याने जीव दिला, अन् अनिल परब नसते उद्योग करतोय’, निलेश राणेंचे टीकास्त्र

Published On: 

सिंधुदुर्ग : वेतन वेळेवर होत नसल्यानं आर्थिक अडचणीत असलेल्या राज्य परिवहन मंडळांच्या चालकानं नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना साक्री (जि.धुळे) येथे घडली. कमलेश बेडसे (वय ४५) असे या कर्मचाऱ्याचं नाव असून आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे. माझ्या आत्महत्येसाठी एसटी महामंडळाला जबाबदार धरावं, असं त्यांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे.

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही. यामुळं मंडळाचे अनेक कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमधून राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी मंत्री परब यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. वेतनाअभावी एसटी कर्मचाऱ्याने जीव दिला, अन् अनिल परब नसते उद्योग करतोय असे म्हणत राणे यांनी परबांवर निशाणा साधलाय.

मागील १७ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नाही. आता तर जुलै महिन्याचा पगार ऑगस्ट महिना संपायला आला तरी मिळालेला नाही. शुक्रवारी एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. परिवहन खाते अनिल परबकडे आहे, नसते उद्योग करत बसतो. एसटी गाड्या मंत्रालयाच्या आवारात उभ्या करा. असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान, जुलै महिन्याचे वेतन एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. एसटी कामगार संघटनांनी यासंदर्भात औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कर्मचाऱ्यांचे वेतन ३ सप्टेंबरपर्यंत द्यावे, असे अंतरिम आदेश शुक्रवारी दिले. आर्थिक परिस्थितीमुळे गेल्या महिन्याभरात राज्यात एसटीच्या पाच कर्मचाऱ्यांनी आत्महत्या के ल्या आहेत. त्यात वेतन नियमित होत नसल्याचे प्रमुख कारण असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!