सातारा : लोकसभेची निवडणूक लागली की पक्ष आपला नेता निवडून देतो. तो नेता निवडला की त्याचा दुसऱ्या दिवशी शपथविधी होतो. तो पंतप्रधान होतो. त्या व्यक्तीने पंतप्रधान पदाची शपथ घेतली की संसद आपली आत्महत्या करते असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
ते कराड येथे जिल्हा काँग्रेस कमिटी कायदा विभागाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कराडमध्ये आनंदराव ऊर्फ दाजीसाहेब चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विधी सल्ला शिबीर आयोजित करण्यात आले होते.
आमदार चव्हाण म्हणाले, लोकसभेची निवडणूक लागली की सर्वात मोठा पक्ष आपला नेता निवडून देतो. तो पंतप्रधान होतो. त्या व्यक्तीने पंतप्रधान पदाची शपथ घेतली की संसद आपली आत्महत्या करते. संसदेला काहीही अधिकार राहत नाहीत. आपल्या देशामध्ये जो अमेरिका इंगलंडमध्ये नाही तो पक्षांतर बदली करण्याचा वापर आता होऊ लागला आहे. आपल्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेत अस्तित्वात असलेली कल्पना अंमलात आणली गेलेली नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पक्षांतर्गत कायदे बंदीचा पुनर्विचार करायला हवा. खासदार आणिआमदारांना पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या गुलामाप्रमाणे वागणूक दिली जाते असेही चव्हाण यावेळी म्हणाले. ‘व्हिफ आला की मग तुम्ही फक्त हात वर करायचा. पक्षाने सांगितले की तुम्ही या विधेयकावर अमुक अमुक सही करा की संपलं. त्यामुळे आपल्याकडे दोनच कलमं आहेत एक पंतप्रधान आणि त्यांच्या अंतर्गत असणारे आयएएस अधिकारी. सध्या तेच सरकार चालवतात आहे’ असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- कोहलीने लीड्स कसोटीतील पराभवाचे खापर फलंदाजीवर फोडले, म्हणाला..
- ९१ धावांवर बाद होताच पुजाराने तोडला राहुल द्रविडचा अनोखा विक्रम
- मैदानात घुसलेल्या ‘त्या’ व्यक्तीवर आजीवन बंदी; इंग्लिश काउंटी यॉर्कशायरने केली मोठी कारवाई
- लीड्स कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, जडेजाला झाली मोठी दुखापत
- देशात महाराष्ट्र अग्रेसर ; कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या गेली दीड कोटीवर


