Share

अजित पवारांना अज्ञाणी म्हणत राणेंचा जाहीर इशारा, ‘अजून मी राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही!’

Published On: 

सिंधुदुर्ग : नुकतेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याकडून राज्याला निधी मिळण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ‘सुक्ष्म आणि लहान खात्यातून आम्हाला काय निधी मिळणार?, केंद्रातून निधी द्यायचाच म्हटलं तर नितीन गडकरी यांचं खातं निधी देऊ शकतं. गडकरींनी याआधी बराच निधी दिला आहे. राज्यात अनेक कामेही प्रगतीपथावर आहेत’, असे अजित पवार म्हणाले होते.

अजितदादांच्या या उत्तराला नारायण राणे यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. कोकणातील जन आशीर्वाद यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. त्यानिमित्ताने नारायण राणेंनी सिंधुदूर्गातील कणकवली येथे माध्यमांशी संवाद साधला. ‘अजित पवार अजून अज्ञान आहेत. त्यांनी आपलं खातं सांभाळावं. आपण अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही. एका रात्रीत आपल्यावरी गुन्हे काढून टाकण्यासाठी पदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांनी मला तोंड उघडायला लावू नये’ अस इशाराही राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

‘माझ्या खात्याला अर्थमंत्र्यांकडून निधी मिळतो. पंतप्रधान योजनांना पंतप्रधान निधी देतात. माझ्याकडे असणाऱ्या योजनांना एकाच वेळी साडे चार लक्ष निधी दिला होता. त्यातील तीन लक्ष कोटी खर्च झाला, अजून एक कोटी २५ लक्ष शिल्लक आहेत. याशिवाय वर्षभरात येणाऱ्या मागण्या पाहतात अर्थखातं पैसे देणार. तुमच्या तिजोरीत पैसा आहे का? अतिवृष्टीसाठी पैसे नाहीत. पुराचा फटका बसेलल्यांना एक रुपयाची मदत नाही. शेतकरी, सरकारी कर्मचारी यांना मदत नाही. एसटी कामगारांना पगार नाही म्हणून आत्महत्या करत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही याची चिंता करा पवारसाहेब या शब्दांत राणे यांनी टोला लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!