🕒 1 min read
अमरावती:- महाराष्ट्राला पण समृद्धी महामार्ग कधी पूर्ण होतोय, याची उत्सुकता आहे. जेव्हा समृद्धी महामार्ग पूर्ण होईल, तेव्हा तो सर्वोत्तम महामार्ग असेल, त्याचा निश्चित महाराष्ट्राला अभिमान वाटेल. येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी प्रवास करणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
समृद्धी महामार्ग ५६ हजार कोटींचा प्रकल्प असून, या महामार्गामुळे नागपूर-मुंबई प्रवास ६ तासांवर येणार आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे ६० टक्के काम पूर्ण झाले होते. जिल्ह्यातील फतियाबाद ते वैजापूर तालुक्यातील सुराळ्यापर्यंत ६० टक्के महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या मे अखेरपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली होती.
दरम्यान, येत्या १ मेपर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करू शकतो. येत्या १ मेपर्यंत आपण शिर्डीपर्यंत जाऊ. त्याच्या पुढच्या १ मेपर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचलेलं असू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलं आहे. लॉकडाऊनमध्ये कामात कुठे तरी अडचण येईल, खंड पडेल, असं वाटलं होतं. पण कोरोना काळातही काम मंदावलेलं नाही, असे ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का’; राणेंचा दादांना टोला
- येडीयुरप्पांच्या ‘मराठा विकास प्राधिकरण’ स्थापनेविरोधात कन्नड संघटनांकडून कर्नाटक बंद !
- यापुढे राज्यातील भाजपच्या नेत्यांनी झेपेल तितकंच बोलावं; प्राजक्त तनपुरेंचा भाजप नेत्यांना टोला
- तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेमधील ‘या’ महत्वाच्या व्यक्तीने जीवन संपवले
- दोन दिवसाचं अधिवेशन लोकशाहीला पोषक नाही,नानांचा सरकारला घरचा आहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
