🕒 1 min read
पंढरपूर:- हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबरला होणार आहे. हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार असल्याचे नक्की झाले आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत मुंबईतच होण्याची शक्यता होती. ७,८ आणि ९ डिसेंबर असे तीन दिवस अधिवेशन होण्याची शक्यता होती. मात्र, आता २ दिवसच हे अधिवेशन होणार असल्याने आता भाजपसह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही दोन दिवसांचं अधिवेशन आपल्याला मान्य नसल्याचं म्हटलंय. नाना पटोले हे काल पंढरपुरात आले होते यावेळी विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.सध्या कोरोनाचे संकट आहे. अधिवेशनासाठी अनेक लोक विविध प्रश्नांवर एकत्र येतील. प्रश्न मार्गी लागावेत म्हणून लोक आंदोलन करतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. हे खरं असलं तरी दोन दिवसाचं अधिवेशन लोकशाहीला पोषक नाही. याचा विचार करुन अधिवेशनाचं कामकाज जास्त कालावधीत कसं चालेल, याकरता नवीन नियमावली कशी करता येईल. यावर चर्चा सुरु असल्याचं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.
दरम्यान, भाजपने हिवाळी अधिवेशन किमान १५ दिवसांचे असावे अशी मागणी केली होती. तसेच, हे अधिवेशन नागपूरात व्हावे अशीही मागणी केली होती. मात्र, हिवाळी अधिवेशन आता मुंबईत २ दिवसांसाठी होणार हे निश्चित झाले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे. ”केवळ दोन दिवसांचं अधिवेशन आम्हाला मान्य नाही,असं फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का’; राणेंचा दादांना टोला
- टीम इंडियाच्या गब्बरचा आज जन्मदिवस
- मोठी बातमी : शेतकऱ्यांची ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक!
- अन्वय नाईकप्रकरणी अर्णबच्या अडचणीत वाढ! रायगड पोलिसांनी दाखल केलं आरोपपत्र
- तृप्ती देसाईंनी शिर्डीत स्टंटबाजी केल्यास काळे फासणार; शिवसेना महिला आघाडी आक्रमक


