Share

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेमधील ‘या’ महत्वाच्या व्यक्तीने जीवन संपवले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या लेखकाने आपले आयुष्य संपवले.  राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. सदर घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या हाती सुसाइडनोट सापडली. आपण आर्थिक परिस्थितीचा सामना करत असल्याचं त्याने नोटच्या माध्यमातून सांगितले. मात्र तो सायबर फसवणूकीचा आणि ब्लॅकमेलचा शिकार झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला.

शिवाय अभिषेकला सतत फोनवरून धमक्या मिळत असल्याचा दावा देखील त्याच्या कुटुंबीयांनी केला. अभिषेकने घेतलेले कर्ज परत करण्यासाठी दबाव निर्माण केला जात होता, असं देखील त्याच्या भावाने सांगितले आहे. भावाच्या मृत्यूनंतर मी त्याचा मेल तपासून पाहिला त्याला वेग-वेगळ्या नंबरवरून फोन येत होते.

‘इजी लोन’ ऍपच्या माध्यमातून अभिषेकने कर्ज घेतले होते. त्या कर्जाच्या परतफेडीची रक्कम अधिक होती. शिवाय अभिषेकने ज्या ऍपद्वारे कर्ज घेतले होते तो ऍप ऑनलाइन सायबर घोटाळ्यात सामील असल्याचं अभिषेकच्या भावाने सांगितले आहे. अभिषेकला बांगलादेश, म्यानमार आणि उर्वरित भारतातील वेगवेगळ्या राज्यातून फोन येत होते. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!