🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. आता निवडणुकीतील विजयानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपला चांगलेच खडेबोल सुनावले जात आहेत. या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यमंत्री तनपुरे यांनीही ट्वीट करीत भाजपवर निशाणा साधला आहे.
‘विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी घवघवीत मते मिळवत विजयरथ खेचून आणला आहे. मतांच्या माध्यमातून सुजाण नागरिकांनी महाविकास आघाडीवर असलेल्या विश्वासावर शिक्कामोर्तब केला आहे. आता यापुढे राज्यातील भाजपच्या नेत्यांनी झेपेल तितकंच बोलावं. उगाच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याच्या फंदात कार्यकर्त्यांचं मानसिक खच्चीकरण कराल,’ असा टोला तनपुरे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून लगावला आहे.
दरम्यान, पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भाजपकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजपला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का’; राणेंचा दादांना टोला
- टीम इंडियाच्या गब्बरचा आज जन्मदिवस
- मोठी बातमी : शेतकऱ्यांची ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक!
- अन्वय नाईकप्रकरणी अर्णबच्या अडचणीत वाढ! रायगड पोलिसांनी दाखल केलं आरोपपत्र
- तृप्ती देसाईंनी शिर्डीत स्टंटबाजी केल्यास काळे फासणार; शिवसेना महिला आघाडी आक्रमक


