🕒 1 min read
मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.पुणे शिक्षक आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.अमरावतीमध्ये मात्र शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला.
या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.यातच पमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. मात्र त्यांनी भाजपवर देखील टीका केली. पवार म्हणाले, नागपूर आणि पुण्यात बऱ्याच वर्षांपासून पदवीधर मतदारसंघांमध्ये एका पक्षाची मत्तेदारी होती. मात्र सुशिक्षित वर्ग देखील महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. पदवीधर, शिक्षक मतदार आमच्या पाठीशी आहेत हे सिद्ध झालं.
पुढे बोलताना ते म्हणाले, बरेच जण वाचाळ बडबड करत होते. मी त्यांची नावं घेऊन कारण नसताना वेळ घालवू इच्छित नाही. मात्र हा निकाल म्हणजे त्या वाचाळविरांना ही फार जबरदस्त चपराक बसलेली आहे. आता लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय हे या निकालांवरुन स्पष्ट झालं आहे असं अजित पवार म्हणाले.
वाह अजित दादा वाह!! एका वर्षा पूर्वी ज्यांना चपराक बसली म्हणताय त्यांच्या बरोबर उपमु्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली हे विसरलात?? कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का.
Shared by Loksatta app https://t.co/sL9qxfasS3
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 4, 2020
दरम्यान,भाजपवर केलेल्या या अप्रत्यक्ष टीकेला माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या खास शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. वाह अजित दादा वाह!! एका वर्षा पूर्वी ज्यांना चपराक बसली म्हणताय त्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली हे विसरलात?? कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का असं म्हणत पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वाऱ्याची चाहूल; शिवसेनेची भाजपवर टीका
- ‘हा विजय महाविकास आघाडीतील सर्वांच्या संघटीत व सुनियोजित प्रयत्नांचा परिणाम आहे’
- विधान परिषद निवडणुकीचे निकाल राज्य सरकारला अधिक भक्कम करणारे : अशोक चव्हाण
- काँग्रेसच्या विचाराने हा देश पुन्हा आपल्याला बळकट बनवायचा आहे : बाळासाहेब थोरात
- ‘आम्ही सर्वशक्तिमान एकटेच लढणार व जिंकणार हि खुमखुमी त्यांचीच होती, ती चांगलीच जिरली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

