Share

येडीयुरप्पांच्या ‘मराठा विकास प्राधिकरण’ स्थापनेविरोधात कन्नड संघटनांकडून कर्नाटक बंद !

Published On: 

🕒 1 min read

बंगळुरू: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून अद्याप देखील न सुटलेला प्रश्न आहे. भाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग कर्नाटकमध्ये गेला. त्यामुळे या सीमावर्ती भागामध्ये नेहमीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू असतो. मात्र यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा मराठा विकास प्राधिकरणासाठी मान्यता दिली होती. हा निर्णय कर्नाटकातील मराठा बांधवांच्या हिताचा असेल मात्र  मराठा विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा काही दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारने घेतलेल्या राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात कन्नड समर्थक संघटनांनी आज बंदची हाक दिली आहे. आज राजधानी बंगळुरूसह राज्यभरात बंद पाळण्यात येत आहे.

कर्नाटकच्या हुबळी जिल्ह्यातदेखील कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली असून वाहतूक सेवाही काही प्रमाणात बंद आहे. शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंगळुरूच्या टाऊन हॉलमध्ये मराठा विकास प्राधिकरण स्थापनेच्या विरोधात आंदोलन करणार्या कन्नड कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कर्नाटकमध्ये आज राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला असून कन्नड समर्थक कार्यकर्ते विविध ठिकाणी आंदोलन करत आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी १५ नोव्हेंबरला यासंबंधीचे आदेश दिले होते. तसेच मराठा विकास प्राधिकरणासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली असून निधी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती दिली होती. कर्नाटक राज्यात सीमारेषेवरील परिसरात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!