Share

नवाब मलिकांच्या ‘त्या’ आरोपांवर समीर वानखेडेंच्या वडिलांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी धक्कादायक खुलासे केल्यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची खात्यांअंतर्गत चौकशी होणार आहे. प्रभाकर यांनी केलेल्या आरोपानंतर समीर आणि प्रभाकर यांची अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्यामार्फत चौकशी केली जाणार आहे. दरम्यान यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करत समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या संदर्भात समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता समीर यांच्या वडिलांनीही याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना ते म्हणाले की,’माझं नाव ज्ञानदेव कचरू वानखेडे आहे दाऊद नाही. हे कोणीतरी केले असेल किंवा लिहिले असेल, याच्याबद्दल माहिती नाही. पण माझे खरे नाव ज्ञानदेव कचरू वानखेडे आहे. माझ्याकडे शाळा सोडल्याचा दाखला, पदवीचे प्रमाणपत्र, पत्नीने हिंदू पद्धतीने लग्न केल्याचे प्रमाणपत्र आहे. त्यानंतरही प्रश्न कुठून उद्भवतात हे मला समजत नाही.’ तसेच तुम्ही नावात बदल केला म्हणून प्रमाणपत्रावर दाऊद असे नाव असल्याचे सांगितले जात आहे असे विचारल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हे सर्व खोटे आहे. कोणीतरी बनावट पद्धतीने हे केले आहे. सर्व कागदपत्रांवर मुलाचेही नाव समीर ज्ञानदेव वानखेडे असेच आहे. समीर वानखेडेच्या पहिल्या पत्नीच्या मुलाच्या जन्म प्रमाणपत्रावरही समीर ज्ञानदेव वानखेडे असाच उल्लेख आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’नवाब मलिक हे त्यांच्या जावयाला पकडल्यापासून मागे लागले आहेत. सरकार त्यांचे असल्याने ते काहीही करु शकतात. माझ्याकडे पुरावे आहेत. त्यांनी समोर आणलेले प्रमाणपत्र हे खोटे की बनावट आहे हे मला माहित नाही.’ समीर यांच्या पहिल्या लग्नाबाबत ते म्हणाले की,’ तो फोटो बरोबर आहे. नियमानुसार घटस्फोट देखील झाला आहे. त्यात काही चुकीचे नाही. हे प्रकरण संपल्यानंतर त्याला राजीनामा द्यायला सांगू. तो वकिल आहे. देशाची सेवा करण्याची जिद्द आहे म्हणून तो हे काम करत आहे. त्याच्यावर हल्ला झाला तरी हे सरकार काही करत नाही,’ असेही यावेळी ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!