मुंबई : आर्यन खान प्रकरण रोज नवनवे वळण घेत आहे. आर्यन खान प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साईलने अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. तर, अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे देखील वानखेडेंवर सातत्याने आरोप करत आहेत. या प्रकरणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.
‘समीर वानखेडे यांना संरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे. राज्यपालांना भेटून त्याबाबतची मागणी करण्यात येणार आहे. समीर वानखेडे हे मागास जातीतील अधिकारी आहेत. म्हणून त्यांना नवाब मलिक यांनी लक्ष्य केले आहे. समीर वानखेडे यांनी मलिक यांच्या जावयाला अटक केली होती, त्यामुळे ते समीर वानखेडेंवर आरोप करत आहे. प्रत्यक्षात मात्र, समीर वानखेडे आपले कर्तव्य बजावत होते’ असंही ते म्हणाले.
नवाब मलिक नुसती केंद्र सरकारवर आगपाखड करण्याचे काम करत आहेत. पण वानखेडे यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे राहणार आहोत, असं सांगतानाच वानखेडे यांचं जर काही चुकत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. तसेच समीर वानखेडे यांची नोकरी जाईल, त्यांना तुरूंगात पाठवू या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अल्पसंख्याक कल्याणमंत्री नवाब मलिक यांच्या इशाऱ्याबाबत आठवलेंनी वानखेडेंची नोकरी की, मलिकांचे मंत्रिपद जातयं हे पाहुया, असे आठवले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे; एसआयटी मार्फत चौकशीची मलिकांची मागणी
- केपी गोसावीच्या सहकाऱ्याच्या आरोपांवर समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- कोचिंग क्लासेसनाही लवकरच परवानगी, गृहमंत्री वळसे पाटलांचे आश्वासन
- ‘गांजा फुंकणाऱ्या लोकांबद्दल सहानुभूती असलेले ‘हे’…’; सदाभाऊ खोतांचा परीक्षा गोंधळावर संताप
- मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले शरद पवार, परंतु…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

