Share

समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिमच – मुंबई मनपा

Published On: 

मुंबई: आर्यन खान ड्रग्स प्रकरणातून चर्चेत आलेले एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. ड्रग्स प्रकरण राहिलं बाजूलाच आता त्यांच्या धर्मावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. नवाब मलिक यांच्याकडून दररोज आरोप होत असल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं आहे. या प्रकरणात हायकोर्टात सुनावणी सुरु आहे.

ड्रग्स प्रकरणावरून प्रकरण थेट एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या धर्मावर आले आहे. ते मुस्लिम आहेत की हिंदू यावरून वाद सुरू आहेत, अशातच मुंबई महानगरपालिकेने न्यायालयात कागदपत्रे सादर केले आहेत. वानखेडे यांच्या कागदपत्रात समीर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असल्याचं म्हटलं आहे, असं महापालिकेने हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. त्यामुळे आता आणखी वेगळे वळण या प्रकरणाला मिळत आहे.

या पूर्वी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात सांगितलं की, ते हिंदू महार आहेत आणि त्याची पत्नी झाईदा ही मुस्लिम होती पण त्यांनी हिंदू पद्धतीनुसार लग्न केलं. लग्नानंतर झाईदा हिंदू धर्मात समाविष्ट झाल्या. ज्ञानदेव वानखेडे यांनी स्वत:च आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळेच्या मार्कलिस्ट, पोलीस सेवेत असतानाचे कागदपत्रांचे इतर पुरावे कोर्टासमोर ठेवले. मात्र आता मुंबई महानगरपालिकेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम असल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!