Share

INDvsNZ: आकाश चोप्राने निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन; ‘या’ खेळाडूंना दिला डच्चू

Published On: 

जयपूर : आकाश चोप्राने तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या T20 च्या प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. आकाश चोप्राने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 च्या कामगिरीच्या आधारे या मालिकेसाठी निवडलेल्या आवेश खान, ऋतुराज गायकवाड आणि हर्षल पटेल यापैकी कोणाचीही निवड केलेली नाही.

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) चे नशीब फिरवणाऱ्या व्यंकटेश अय्यरसाठी आकाशने एक मजेदार टिप्पणी केली आहे. आकाशने पाचव्या क्रमांकावर अय्यर असे लिहिले आहे आणि पुढे लिहिले आहे की, तुम्हाला जो आवडते त्याचा विचार करा.

खरे तर व्यंकटेश अय्यर व्यतिरिक्त भारतीय संघात श्रेयस अय्यर देखील आहे. आकाशने टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी कर्णधार रोहित शर्मासह इशान किशनवर सोपवली आहे, तर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आकाश चोप्राने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी केएल राहुलची निवड केली आहे.

या प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर आहे, तर अय्यर पाचव्या क्रमांकावर आहे. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर आहे, तर आकाशने अष्टपैलू म्हणून अक्षर पटेलची संघात निवड केली आहे. त्यानंतर आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि मोहम्मद सिराज यांचा क्रमांक लागतो.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!