Share

वीर दासच्या वक्तव्यावर भडकली कंगना; आतंकवादी म्हणून केली तुलना

Published On: 

मुंबई : अभिनेता वीर दास आणि स्टँड-अप कॉमेडियन याने अमेरिकेतल्या शोमध्ये भारतीयांबद्दल वक्तव्यावरून सध्या देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर आता अभिनेत्री कंगना रणौतने वीर दासवर संताप व्यक्त केला आहे. त्याच्या या वक्त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील तिने केली आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत वीर दासला ट्रोल केले आहे. एवढचं काय तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे असे ती म्हणाली आहे. “जेव्हा तुम्ही सगळ्या भारतीय पुरुषांना गँग रेपिस्ट म्हणून बोलतात तेव्हा जगभरातील लोकांना भारतीयांविरुद्ध वर्णद्वेष आणि गुंडगिरी करण्यास प्रोत्साहीत करत आहे. बंगालमध्ये झालेल्या दुष्काळानंतर चर्चिल म्हणाले, ‘हे भारतीय सशांसारखे आहेत आणि ते असेच मरणार आहेत’ अशा प्रकारे एका विशिष्ट जातीला लक्ष्य करणे हे सौम्य दहशतवाद आहे. वीर दास विरोधात कठोर करवाई झालीच पाहिजे”, असे कंगना म्हणाली आहे. तसेच वीरची तुलना आतंकवादी म्हणून देखील तिने केली आहे.

Vir Das Kangana Ranaut | Kangana Ranaut Demands Strict Action Against Comedian Vir Das | वीर दास के मोनोलॉग पर बोलीं- ऐसा क्रिएटिव काम एक आतंकवाद है, कार्रवाई होनी चाहिए - Dainik Bhaskar

वीर दासने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज’ हा व्हिडिओ अपलोड केला आहे. वॉशिंग्टन डी सी मधील जॉन एफ केनेडी सेंटरमध्ये त्याच्या अलीकडील सादरीकरणाचा हा व्हिडिओ होता. त्यात त्याने म्हटले, मी अशा भारतातून येतो जिथे आम्ही दिवसा स्त्रीची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतो. सध्या त्याच्या वक्त्याव्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या या वक्त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर सध्या अनेक भारतीयांनी त्याच्यावर टिका केली आहे. तर अनेकांनी त्याच्यावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. तसेच यावेळी त्याने मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्हाला शाकाहारी असण्याचा अभिमान वाटतो आणि तरीही आम्ही भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकर्‍यांवर धावून जात असल्याचे म्हंटले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!