मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्र्ग्ज प्रकरणानंतर आमने-सामने आलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यामधील आरोप प्रत्यारोपांमध्ये आज आणखीन एक भर पडली. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील रिसेप्शनचा एक फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. वानखेडे यांनी मुस्लिम असल्याचं सांगून चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांचा वापर करुन नोकरी मिळवल्याचा दावा मलिक यांनी केला आहे.
समीर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळले असून आपण न्यायालयात उत्तर देऊन असं म्हटलं आहे. मात्र असं असतानाच आता या प्रकरणावरुन समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरनेही पती समीर यांच्यासोबतच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत मलिक यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.
मी आणि माझे पती समीर दोघेही जन्माने हिंदू आहोत. आम्ही कधीही कोणत्याही धर्मामध्ये धर्मांतर केलेलं नाही. आम्हाला सर्व धर्मांचा सन्मान आहे. समीरचे वडीलही हिंदू असून त्यांनी मुस्लीम महिलेशी लग्न केलं होतं. माझ्या सासुबाई आज हयात नाहीत. समीरचं आधीचं लग्न विशेष विवाह कायद्याअंतर्गत झालं होतं. त्याने २०१६ मध्ये घटस्फोट घेतला. आम्ही हिंदू विवाह कायद्यानुसार 2017 साली लग्न केलं, असं क्रांतीने आपल्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
Me n my Husband Sameer r born Hindus.We hv never converted to any other religion.V respect all religions.Sameer’s father too is hindu married to my Muslim Mom in law who is no more.Sameer’s ex-marriage ws under special marriage act,divorced in 2016.Ours in hindu marriage act 2017 pic.twitter.com/BDQsyuvuI7
— KRANTI REDKAR WANKHEDE (@KrantiRedkar) October 25, 2021
महत्वाच्या बातम्या
- केंद्र सरकार सध्या सुडबुद्धीने वागतंय, हे संपूर्ण राज्याला माहिती आहे- दिलीप वळसे पाटील
- माझ्या वडिलांचे नाव दाऊद नाही तर ज्ञानेश्वर; समीर वानखेडेंचं स्पष्टीकरण
- ‘भ्रष्टाचाराचा काळोख दूर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे’
- पुण्यातील हत्या झालेल्या कबड्डीपटू मुलीच्या कुटुंबियांचे चंद्रकांत पाटलांकडून सांत्वन
- भारतात द्वेष पसरवणारी माहिती हाताळण्यात फेसबुक असमर्थ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

