मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज दोन टि्वट करीत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. मलिकांच्या आरोपांवरुन समीर वानखेडेंनी स्पष्टीकरण देत मलिकांनी केलेले आरोप खोटे असल्याचं म्हंटल आहे.
नवाब मलिक यांनी माझा व माझ्या कुटुंबियांचा सामाजिक माध्यमांवर अपमान केला आहे. माझ्या कुटुंबाची खोटी माहिती ट्विटरवर सांगून त्यात अपमानित करणारी वक्तव्य करण्यात आली आहेत. यामुळे मी आणि माझे कुटुंबीय प्रचंड मानसिक तणावात आहेत, असं वानखेडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटलं आहे.
‘माझे नाव समीर दाऊद वानखेडे, असे असल्याचे मलिक यांनी ट्विटरवर म्हटले आहे. मी 2006 मध्ये डॉ. शबाना कुरैशी यांच्याशी विवाह केला व कायद्यानुसार 2016 मध्ये घटस्फोट देखील झाला. त्यानंतर 2017 मध्ये मी क्रांती दिनानाथ रेडकर यांच्याशी विवाह केला. परंतु मंत्री नवाब मलिक यांच्याकडून सामाजिक माध्यमावर खोटी माहिती पसरवून माझी प्रतिम मलिन करीत आहेत. कुटुंबाची वैयक्तिक माहिती अशाप्रकारे जाहिर करणे हे अपमानित करणारे आहे’, असंही वानखेडे यांनी त्या पत्रात म्हटलं
माझ्या वडिलांचे नाव ज्ञानदेव कचरुजी वानखेडे आहे. ते उत्पादन शुल्क विभागातील निवृत्त वरिष्ठ निरीक्षक आहेत. ते 2007 मध्ये निवृत्त झाले. माझ्या आईचे नाव झहिदा (आता हयात नाही) आहे. मी बहुधार्मिक व धर्मनिरपेक्ष अशा भारतीय पारंपरिक कुटुंबातील असून त्याचा मला अभिमान आहे, असे वानखेडेंनी पत्रात म्हटलं आहे.
समीर वानखेडे यांनी वेगवेगळे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. वानखेडेंनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची माहिती दिली. समीर वानखेडे स्वत: कोर्टाला काही माहिती देण्यासाठी साक्षीदाराच्या पिंज-यात उभे राहिले.
मला वैयक्तिकरित्या काही जणांकडून लक्ष्य केलं जात आहे. माझ्यावर, माझ्या कुटुंबियांवर सतत आरोप केले जात आहेत. आजही माझे काही खाजगी फोटो लिक करण्यात आले आहेत, असंही वानखेडे पत्रात म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यातील हत्या झालेल्या कबड्डीपटू मुलीच्या कुटुंबियांचे चंद्रकांत पाटलांकडून सांत्वन
- भारतात द्वेष पसरवणारी माहिती हाताळण्यात फेसबुक असमर्थ
- केंद्र सरकारच्या सुडबुद्धीला पुरून उरणार- दिलीप वळसे पाटील
- प्रशासनात अधिकाऱ्यांनी ‘हो’ आणि राजकारण्यांनी ‘नाही’ म्हणायला शिकणे आवश्यक – मुख्यमंत्री ठाकरे
- पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांकडे तब्बल 100 कोटी बेहिशोबी मालमत्ता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

