Share

“आणि तो आफ्रिकेसाठी खेळतानाही ५० हजार प्रेक्षक एबीडीचे नाव ओरडत होते”; विराट कोहलीने सांगितले चाहत्यांचे प्रेम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू असूनही एबी डिव्हिलियर्सला भारतात अनेक लोक पसंत करतात. जितके भारतीय खेळाडूंचे चाहते असतील तितकेच एबीचे सुद्धा चाहते भारतभर आहेत. आयपीएल (IPL) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) खेळाडू होता. मात्र स्पर्धा नसतानाही भारतीय क्रिकेट रसिकांनी त्याला दिलेल्या प्रेमाचा एका आठवणींचा किस्सा विराट कोहलीने सांगितला आहे.

विराट कोहलीने (virat kohli) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वानखेडे स्टेडियमवर २०१५ मध्ये एकदिवसीय सामन्यात घडलेला किस्सा सांगितलं आहे, ज्यामध्ये आफिकेने ४३८ वर ४ बाद धावा केल्या आणि एबीने ६१ चेंडूत ११९ धावा केल्या होत्या. ” तो (ab deviliers) दक्षिण आफ्रिकेकडून भारताविरुद्ध खेळला तेव्हाही त्याला भारतीय प्रेक्षकांचा पाठिंबा मिळतो. स्टेडियममधील पन्नास हजार लोकांनी ‘एबीडी, एबीडी’ असा जयघोष केला. हे योगायोगाने घडू शकत नाही, असे घडणे ही एक अतिशय, अतिशय खास गोष्ट आहे आणि ती जगात कोठेही कोणासोबतही घडत नाही. दक्षिण आफ्रिकेचे (south africa) चाहते वानखेडेवर आले होते असे नाही, ते भारतीय चाहते त्याच्या नावाचा जयघोष करत होते. इथे काय चालले आहे, असे आम्हालाही समजत नव्हते. पण तो कोण आहे, हीच एबीची जादू आहे.”

एबी डिव्हिलयर्सची लोकप्रियता इतकी आहे की विराट कोहलीने त्याला परदेशी खेळाडूंपैकी एक म्हणून निवडले ज्याला तो भारताकडून खेळताना पाहायला आवडेल. दक्षिण आफ्रिकेकडून खेळत असतानाही तो भारतातील चाहत्यांचा आवडता असल्याने डिव्हिलियर्ससाठीही संघात आरामात समाविष्ट होणे अवघड जाणार नाही, असे कोहली म्हणाला.“एबी सारखा माणूस ज्या वातावरणाचा तो भाग आहे त्या वातावरणात खूप योगदान देऊ शकतो. अप्रतिम माणूस, असाधारण खेळाडू. त्याच्या खेळाबद्दल कुणाला बोलायचीही गरज नाही. तो ज्या प्रकारच्या गोष्टी करतो हे विश्वासाच्या पलीकडे आहे.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!