मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्याने याचा मोठा फटका मराठा समाजाला बसला असून तीव्र नाराजीव्यक्त केली जात आहे. मराठा समाजाने विविध आंदोलने आणि निदर्शने देखील सुरु केली आहेत. तर, खासदार संभाजीराजे छत्रपती हे देखील मराठा आरक्षणासाठी सक्रिय झाले आहेत.
कायदा रद्द झाल्यानंतर संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यानंतर, त्यांनी महाराष्ट्र दौरा करून मूक मोर्चा सुरु देखील केला. तर, राज्य सरकारशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्यांनी मूक आंदोलनाला तूर्तास स्थगिती दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले हे देखील एकत्र आल्याचे दिसून आले. दोन्ही राजांची पुण्यात भेट झाल्याने त्यांचे समर्थक देखील आनंदी असल्याचे दिसून आले.
दरम्यान, उदयनराजेंच्या ‘स्टाईल’बाबत संभाजीराजे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. ‘उदयनराजेंची आणि माझी भेट होते, ती आमची फॉर्मल भेट असते. उदयनराजेंची त्यांची स्टाईल आहे, माझी माझी स्टाईल आहे. उदयनराजेंची कॉलर वर असते, आमची कॉलर शक्यतो वर येत नाही. पण, ज्यावेळी कॉलर वर आणायची असेल, त्यावेळी संभाजीराजेही काही कमी पडत नाहीत,’ असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून चिंता व्यक्त
- ‘लोकांच्या लक्षातही येणार नाही अशा प्रकारे मोदी सरकार खिसा कापत आहे’
- पंतप्रधान मोदी युवकांना म्हणाले, ‘ज्याच्याकडे स्किल असेल तोच पुढे जाईल’
- …अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु, खासदार संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- आमिर-किरणचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

