Share

‘लोकांच्या लक्षातही येणार नाही अशा प्रकारे मोदी सरकार खिसा कापत आहे’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. राज्यभरात काँग्रेसने ठिकठिकाणी आंदोलन करून इंधन दरवाढीचा निषेध केला होता. आता याच मुद्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर नेते राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे.

या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘२०१४ ची लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाने पेट्रोल-डिझेलचा मुद्दा समोर करून ‘अब की बार मोदी सरकार’ अशी जाहिरातबाजी केली. परंतू सत्तेत आल्यानंतर भाजप सातत्याने भाववाढ करत आहे. महत्त्वाची बाब आंतरराष्ट्रीय भाववाढ कमी आहे तरीदेखील देशात भाववाढ कायम आहे’ असा आरोप मलिक यांनी केलाय.

सध्या केवळ सरकारी तिजोरी भरण्याचं काम सुरू आहे. दरवर्षी ४ लाख कोटी रुपये हे सरकार लोकांच्या खिशातुन काढत आहे. बोलायचे एक आणि करायचे एक असे काम मोदी सरकार करत आहे. गॅस दरवाढ, डिझेल दरवाढ थांबायचं नाव घेत नाही. सीएनजीची देखील दरवाढ देखील सुरुच आहे. लोकांच्या लक्षात येणार नाही, अशा प्रकारे त्यांचा खिसा कापण्याचं काम मोदी सरकार करत आहे. महागाईमुळे लोकांचे बजेट हाताबाहेर गेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस देखील आंदोलने करत असल्याचे मलिक यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!