मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती हे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असून येत्या २८ मे रोजी ते पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाविषयी सविस्तर भूमिका जाहीर करणार आहेत. सध्या संभाजीराजे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून विविध भागांमध्ये समाज बांधवांच्या भेटी व बैठक घेऊन त्यांच्या भावना समजावून घेत आहेत.
मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा करण्यासाठी संभाजीराजे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील बैठक संपली आहे. मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे. तसंच मराठा समाजाच्या परिस्थितीची कल्पना शरद पवारांना दिली.
त्यानंतर आता संभाजीराजे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संभाजीराजे राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी दाखल होतील, असे सांगितले जात आहे. मराठा आरक्षणावर राज ठाकरे यांची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणून घ्यायचा संभाजीराजे यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीच संभाजीराजे राज ठाकरे यांना भेटणार असल्याचे समजते.
महत्वाच्या बातम्या
- ‘आषाढी वारीसाठी पोषक वातावरण आहे का?,’ आळंदी संस्थानचे पालखी मार्गावरील गावांना पत्र
- निर्माता करण जोहरने नेहा धुपियाला ‘या’ कारणामुळे लग्नाला दिला तीनदा नकार
- बीडमध्ये पोलिसांची पुन्हा एकदा डॉक्टरला मारहाण!
- ‘आषाढी वारीसाठी पोषक वातावरण आहे का?,’ आळंदी संस्थानचे पालखी मार्गावरील गावांना पत्र
- आधी धोनी आणि आता पंतमुळे वृद्धीमान साहाची कारकिर्द धोक्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

