मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता करण जोहर अजूनही अविवाहित आहे. मात्र लग्न केले नसलं तरी तो सरोगसीच्या माध्यमातून दोन मुलांचा पिता बनला आहे. यश आणि रूही असे त्याच्या मुलांची नाव आहे. दरम्यान नेहा धुपिया आणि करण जोहर यांच्या बाबत चर्चा सुरू झाली आहे. नेहाला बॉलिवूडचा निर्माता करण जोहरबरोबर लग्न करायचे असल्याचे तिने संगितले होते.
https://www.instagram.com/p/CPSLjxznhM3/?utm_source=ig_embed&ig_rid=f266f515-2946-4bec-bee1-6487a7db1be2
नेहाने ‘नो फिल्टर विथ नेहा’ या टॉकशो मध्ये करणसोबतचा हा खास किस्सा सांगितला. नेहाने तिच्या संपूर्ण आयुष्यात केवळ करण जोहरलाच सगळ्यात जास्त लग्नासाठी विचारले असावे असेही तिने सांगितले. नेहाने करणला एकदा -दोनदा नाही तर तीनवेळी लग्नासाठी प्रपोज केले होते. मात्र या तिन्ही वेळा करण जोहरने नकारच दिला. करणला नेहाच्या शरीराच्या कोणत्याही पार्टमध्ये इंटरेस्ट नव्हता. म्हणून त्याने नेहा वारंवार लग्नासाठी नकार दिल्याचे धक्कादायक खुलासा केला होता. करण जोहरने नेहाला नकार देण्यामागे कारणही तसेच विचित्र होते.
तर दुसरीकडे, करण जोहर आणि ट्विंकल एकत्र कॉलेजमध्ये होते. त्यामुळे करणचं ट्विंकलवर प्रेम होतं. मात्र अक्षयच्या एंट्रीमुळे करणचंही हार्टब्रेक झालं. ट्विंकलमुळेच करणने आजपर्यंत लग्नच केले नसल्याचेही बोलले जाते. ‘कुछ कुछ होता है’ या करणच्या सिनेमात टीना ही भूमिका ट्विंकल खन्नाने साकारावी असे करणला वाटत होते. पण ट्विंकलने या सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे ट्विंकलला सगळे टीना या नावानेच हाक मारत असल्याने त्याने या सिनेमातल्या नायिकेचे नाव टीना ठेवले होते.
करणने यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्राकडे ‘दिलवाले दुल्हनिया ये जाएंगे’ या चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिथेच तो चित्रपट निर्मितीतील बारकावे शिकला आणि ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या दिग्दर्शकीय करियरला सुरुवात केली. त्याला पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याने ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनं जिंकली.
महत्त्वाच्या बातम्या
- अभिनेता संजय दत्तला मिळाला युएईचा गोल्डन व्हिसा; सोशल मिडियाद्वारे दिली माहिती
- मागासवर्गीय पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यात यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
- डॉक्टरांविषयी ‘ते’ वक्तव्य अंगलट; IMA कडून बाबा रामदेव यांना १ हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस
- ‘तुम्ही तज्ज्ञ नाहीत, रुग्णांच्या जिवाशी खेळू नका’, व्हेंटिलेटर प्रकरणावरून खंडपीठाने नेत्यांना सुनावले
- ‘राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून मराठा समाजासाठी एकत्र यावे’, खा.संभाजीराजेंचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

