Share

बीडमध्ये पोलिसांची पुन्हा एकदा डॉक्टरला मारहाण!

Published On: 

बीड: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्यात सर्वत्र कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीत केवळ अत्यावश्यक सोयी सुविधा चालू ठेवण्यात आल्या आहेत. तसेच जे फ्रंट लाईन वर्कर्स आहेत त्यांना या संचारबंदीत सूट देण्यात आली आहे. मात्र पुन्हा एकदा येथील पोलिसांनी एका डॉक्टरला मारहाण केल्याची घाना घडली आहे. डॉक्टर सकाळी आपल्या कर्तव्यावर जात असताना त्यांना अडवून त्यांना चौकीत नेऊन मारहाण केल्याची घटना घडली आहे.

जिल्ह्यात नियमांच्या अंमलबजावणीच्या नावाखाली पोलिसांनी अक्षरश: दंडेलशाही सुरू केली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, रुग्ण काहीही न बघता मारझोड, दंड आकारणी होत आहे. बुधवारी कोविड वॉर्डमध्ये ड्यूटी करणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील एका बालरोगतज्ज्ञाला रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नेऊन चार-पाच पोलिस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी या डॉक्टरने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी तक्रार केली आहे.

डॉ. सूरज बांगर हे बालरोगतज्ज्ञ असून सध्या त्यांची जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ३ या कोविड वॉर्डात ड्यूटी सुरू आहे. ते कर्तव्यावर जात असताना रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर त्यांना पोलिसांनी अडवले. त्यांना रुग्णालयात प्रवेश देण्यापासून रोखले. या वेळी त्यांच्यात आणि पोलिसांत शाब्दिक चकमक झाली. गेटवर बंदोबस्ताला असलेल्या चार ते पाच पोलिसांनी त्यांना शिवीगाळ करून रुग्णालय पोलिस चौकीत नेत मारहाण केली.

याबाबत डॉ. बांगर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गितेंना या घटनेबाबत लेखी कळवले. दरम्यान, मागील काही दिवसांपासून बीड शहरासह जिल्ह्यातही नियमांच्या अंमलबजावणीच्या नावाखाली दंडात्मक कारवाया करून सामान्यांची लूट सुरू केली. पोलिसांकडून अपमानकारक वागणूक, मारहाणीच्या शेकडो तक्रारी आहेत. यापूर्वीही डॉक्टर, आरोग्यसेवकांना मारहाण झाली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!