🕒 1 min read
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून आषाढी वारी बंद आहे. यंदाही कोरोनाचे सावट आहे. पण वारीसाठी पोषक वातावरण आहे का, गावात कोरोनाची परिस्थिती कशी आहे, याबाबत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने पालखी मार्गावरील गावांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या गावांनी येत्या चार-पाच दिवसांत त्याचे उत्तर आळंदी संस्थानला द्यावे, असे पत्र श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने पालखी मार्गावरील गावांचे सरपंच व नगरपालिकांचे नगराध्यक्ष यांना पाठविण्यात आले आहे.
संस्थानचे अध्यक्ष डॉ. अभय टिळक यांनी माध्यमांना सांगितले की, आषाढी वारीपूर्वी चैत्री वारीच्या निमित्ताने पालखी मार्गावरील गावांचा पाहणी दौरा व्हायचा. या दौऱ्यात मुक्कामाची ठिकाणे, रस्त्याची परिस्थिती, आरोग्य, पाणीपुरवठा , वीज आदींचा आढावा घेतला जात असे. तसेच चैत्र शुद्ध दशमीला पंढरपूर येथे आळंदी संस्थान, मानकरी, दिंडी समाज व फडकरी यांची बैठक होत असे.
या बैठकीत वारीच्या वाटचालीबाबत विचारविनिमय व्हायचा. तिथीची वृद्धी किंवा क्षय झाला तर मुक्कामाची ठिकाणे, वाढीव मुक्काम यावर चर्चा व्हायची. परंतु गेल्या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे आषाढी पायी वारी झाली नाही. त्यामुळे यंदा वारकऱ्यांना वारीची आशा आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात आपल्या कार्यक्षेत्रातील आजची परिस्थिती नेमकी काय आहे, यंदाचा आषाढी सोहळा पायी वारीच्या स्वरूपात असावा का, सोहळ्यामधील वारकरी भाविकांची संख्या किती असावी, मुक्कामाच्या तळावर आपण कोण कोणत्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकता, असे प्रश्न पाठवण्यात आले आहेत. या गावांनी येत्या चार-पाच दिवसांत त्याचे उत्तर आळंदी संस्थानला द्यावे असे सांगण्यात आलेय.
महत्वाच्या बातम्या
- ‘राजे… वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही’
- प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना हृदयविकाराचा झटका; अँजिओप्लास्टीनंतर तब्येतीत सुधारणा
- मुक्ताईनगरचा वचपा माथेरानमध्ये, शिवसेनेचे 14 पैकी 10 नगरसेवक भाजपमध्ये
- संपुर्ण कारकिर्दीत केवळ एका टी-२० सामन्यात खराब कामगिरी केल्याचा ‘या’ भारतीय गोलंदाजाचा दावा
- लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीच्या घोळात अडकली का? भाजपाचा राज्य सरकारला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
