मुंबई : गेल्या दशकात भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून महेंद्रसिंह धोनी हा एकमेव पर्याय भारतीय संघासमोर होता. जोपर्यंत धोनी संघात होता तोपर्यंत त्याची जागा घेणे केवळ अशक्य होते. यादरम्यान भारतीय संघात यष्टीरक्षणासाठी अनेक खेळाडू ताटकळले होते. यादरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर भारतीय संघात वृद्धीमान साहाची एन्ट्री झाली.
मात्र यादरम्यान भारतीय संघात युवा खेळाडू रिषभ पंतला धोनीचा पर्याय म्हणून पाहीले जात होते. यादरम्यान धोनीने मर्यादीत षटकाच्या सामन्यातून निवृत्ती स्विकारल्यानंतर रिषभ पंतचे भारतीय संघात स्थान जवळपास पक्के झाले. यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वृद्धीमान साहा जखमी झाल्यानंतर कसोटी संघात पुन्हा रिषभ पंतला संधी देण्यात आली. पंतने या संधीचे सोने करत धडाकेबाज खेळी केली आणि भारतीय संघातील जागा निश्चीत केली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत वृद्धीमान साहाला संघात स्थान मिळाले. मात्र पंतच्या कामगीरीमुळे साहाला संपुर्ण मालिका बाकावर बसावे लागले. आता आगमी इंग्ंलड दौऱ्यातील भारतीय संघात रिषभ पंत आणि वृद्धीमान साहा दोघांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र पंतचा एकुण फॉर्म बघता साहाला पुन्हा बाकावर बसण्याची वेळ येऊ शकते. साहाने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ३८ सामन्यात ५२ डावामध्ये फलंदाजी करताना १२५१ केल्या आहेत. यात ३ शतके आणि ५ अर्धशतके झळकावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खासगी रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन करणारे जितेंद्र भावे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
- महुआ मोईत्रा यांनी बाबा रामदेव यांना झापलं, म्हणाल्या… ‘तुमचा बाप आणि भाऊ, तर…’
- ‘अवघ्या 10 मिनिटांच्या या भेटीत मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा कशी काय होऊ शकते?’
- ‘शरद पवार यांचा सरकारला पूर्णपणे आशीर्वाद असून हे सरकार पाच वर्षे चालेल’
- २०१५ मध्ये प्रधानसेवकांनी केलेल्या वक्तव्याची नवाब मलिक यांनी करुन दिली आठवण, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
