लातूर : सध्या पुरामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्राचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथे अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेट देऊन मदत केली. मात्र त्या परिस्थितीवरून राजकीय टोलेबाजी पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर निशाना साधत आहे.
त्यावर भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी टीका केली आहे. त्यांनी सोशल मिडीयाद्वारे पोस्ट करत, ते म्हणले, ‘ वाहून गेले राज्य तरी सोडला नाही बाणा – वसुलीवर लक्ष ठेवून, केंद्राकडून मदत आणा. त्याला भागिले तीन हाणा.’ असे ते म्हणले. त्यांनी या पोस्टद्वारे आघाडी सरकारवर निशाना साधला आहे, तसेच सध्या परीस्ठीवर सरकार काय करत आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, कोकणात व पश्चिम महाराष्ट्रात सध्या परिस्थिती गंभीर आहे. राज्य व केंद्र सरकार दुर्घटनाग्रस्तांना पुनर्वसनासाठी मदत करणार आहे. त्यात त्यांनी आर्थिक मदत देखील देण्याचा निर्णय घेतला आहे, केंद्राने ७०१ कोटीचा निधी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिला आहे. तसेच केंद्राकडून नारायण राणे यांना पाहणी करण्यासाठी पाठविण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसी समाजासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, वैद्यकीय शिक्षणात २७% आरक्षण
- गडकरी घेणार धाडसी निर्णय; महापुरातही कोल्हापूरचा पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क तुटू देणार नाही
- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमारच्या इंग्लंड दौऱ्यात करण्यात आला ‘हा’ बदल
- डॉमीनोझ नंतर आता ‘या’ कंपनीने केली पदक विजेत्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा
- ऑलिम्पिक स्पर्धेतील मेरी कॉमचा प्रवास संपुष्टात, मात्र पराभवानंतरही जिंकले मन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

