Share

ऑलिम्पिक स्पर्धेतील मेरी कॉमचा प्रवास संपुष्टात, मात्र पराभवानंतरही जिंकले मन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची बॉक्सर मेरी कॉमचा प्रवास संपुष्टात आला आहे. राऊंड १६ फेरीत झालेल्या लढतीत मेरीचा पराभव झाला आहे. मात्र पराभवानंतर मेरी कॉमने केलेल्या कृत्यामुळे चाहत्यांची मने तिने जिंकली आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात गुरुवारी भारताची अनुभवी बॉक्सर मेरी कॉमचा पराभव झाला. अतीशय कडवी झूंज दिलेल्या कोलंबियाची इनग्रिट वेलेंसियाने मेरी कॉमचा २-१ असा पराभव केला आहे. या सामन्यातील पहिल्या राऊंडमध्ये वेलेंसियाने सुरुवातीपासुनच आक्रमक खेळ करत ४-१ अशा फरकाने विजय मिळवला.

तर दुसऱ्या राऊंडमध्ये मेरी कॉमने दमदार पुनरागमन केले. दुसरा राऊंड मेरी कॉमने ३-२ असा जिंकत दमदार पुनरागमन केले. यानंतर झालेल्या अंतिम आणि निर्णायक राऊंडमध्ये दोन्ही खेळाडूंनी संपुर्ण अनुभव पणाला लावत कडवी झुंज दिली. मात्र अखेर या राऊंडमध्ये मेरी कॉमला ३-२ असा निसटता पराभव स्विकारावा लागला. पराभव झाल्यानंतर मात्र मेरी कॉमने प्रतिस्पर्धी वेलेसिंयाची गळाभेट घेतली आणि तिचे आभिनंदन केले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा ही मेरी कॉमची अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा ठरु शकते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!