🕒 1 min read
नवी दिल्ली : देशातील ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या पुढील काळात ऑल इंडियन क्वोटा स्क्रीमध्ये वैद्यकीय शिक्षणात ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्षापासून पदवीपूर्व आणि पदव्युत्तर वैद्यकीय/दंत अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय कोटा योजनेत ओबीसींसाठी २७% आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागासाठी १०% आरक्षण देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
Our Government has taken a landmark decision for providing 27% reservation for OBCs and 10% reservation for Economically Weaker Section in the All India Quota Scheme for undergraduate and postgraduate medical/dental courses from the current academic year. https://t.co/gv2EygCZ7N
— Narendra Modi (@narendramodi) July 29, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाची माहिती देतांना म्हटले की, ‘चालू शैक्षणिक वर्षापासून ओबीसींसाठी २७% आरक्षण आणि अखिल भारतीय कोटा योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी १०% आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. यामुळे दरवर्षी आपल्या हजारो तरुणांना चांगल्या संधी मिळू शकतील आणि आपल्या देशात सामाजिक न्यायाचे नवीन प्रतिमान निर्माण होईल.’
महत्त्वाच्या बातम्या
- डॉमीनोझ नंतर आता ‘या’ कंपनीने केली पदक विजेत्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा
- दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना; मुख्यमंत्री म्हणाले, ‘रात्री बाहेरच का पडल्या?’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- ‘नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावा?’
- ‘या’ चार जिल्ह्यांत बरसणार मुसळधार पाऊस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

