नवी दिल्ली : १ जुलै पासून सलग तीन दिवस कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले होते. या जिल्ह्यांमध्ह्ये झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे २०१९ पेक्षाही अधिक गंभीर स्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूरमध्ये शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश भाग हा पुराच्या पाण्याखाली गेला होता. यामुळे हजारो कुटुंबाना फटका बसला असून घरासह व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे.
चौथ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूर उतरण्यास सुरुवात झाली असून पूरग्रस्त भागांमधील पाणी ओसरत आहे. पूरामुळे राज्यासह कर्नाटक आणि गोव्यासाठी महत्वाचा असणारा पुणे-बंगळुरू महामार्ग हा बंद झाला होता. शिरोली भागात महामार्गावर १३ फुटांहून अधिक पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे अत्यावश्यक मदत पुरवण्यात देखील अडथळा निर्माण झाला होता तर हजारो वाहने महामार्गावर अडकली होती.
आता हा महामार्ग पून्हा सुरु झाला असून येत्या काळात पून्हा महापूराची स्थिती उद्भवल्यास कोल्हापूरचा पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क तुटू नये म्हणून महामार्गावर पाणी येणाऱ्या ठिकाणांवर उड्डाणपूल उभारले जावेत अशी मागणी केली जात आहे. याबाबत राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मागणी केली आहे. या मागणीबाबत लवकरात लवकर बैठक घेऊन काम सुरु करण्याबाबत नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
…याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी जी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व पत्र दिले. यावर गडकरीजी यांनी अधिवेशन संपल्यानंतर संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन कोल्हापूरचा संपर्क कधीही तुटू नये यावर मार्ग काढू असे आश्वासन दिले.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 29, 2021
याबाबत संभाजीराजे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ‘महापूरात कोल्हापूरचा पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क तुटू देणार नाही असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. महापूरात राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीसाठी ठप्प होऊ नयेत. यामुळे आवश्यक ती मदत व बचावकार्य राबविण्यासाठी पूरबाधित शहरांचा संपर्क तुटू नये, यादृष्टीने महामार्गांची बांधणी करावी, याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व पत्र दिले. यावर गडकरी यांनी अधिवेशन संपल्यानंतर संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन कोल्हापूरचा संपर्क कधीही तुटू नये यावर मार्ग काढू असे आश्वासन दिले,’ असं ट्विट संभाजीराजे यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- डॉमीनोझ नंतर आता ‘या’ कंपनीने केली पदक विजेत्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा
- दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना; मुख्यमंत्री म्हणाले, ‘रात्री बाहेरच का पडल्या?’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- ‘नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावा?’
- ‘या’ चार जिल्ह्यांत बरसणार मुसळधार पाऊस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

