Share

मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली नाही तर काय होईल हे मला सांगायची गरज नाही – संभाजीराजे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे संपन्न झाले. आंदोलनानंतर मराठा समन्वयक आणि आंदोलकांशी संभाजीराजे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात भेट होत आहे.

या भेटीत पाच मागण्या आणि मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. मात्र, भेट सकारात्मक न झाल्यास काय होईल हे सांगायची गरज नाही, असा सूचक इशाराच संभाजी छत्रपती यांनी बैठकीपूर्वी दिला आहे. त्यामुळे आजच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संभाजी छत्रपती यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना पाच मागण्या दिल्या आहेत. मूक आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेला बोलावलं. त्याचं मी स्वागत करतो. चर्चा सकारात्मक होईल याची अपेक्षा आहे. मात्र, चर्चा झाली नाही तर काय होईल हे मला सांगायची गरज नाही, असा सूचक इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.

तर, कोल्हापूरात झालेल्या मराठा मुक आंदोलनाचे परिणाम दिसत आहेत. सरकारने समाजाच्या मागण्याबाबत पहिले सकारात्मक पाऊल उचलले आहे. विचारविनिमय करण्यासाठी आज निमंत्रित केले आहे. मराठा समाजाच्या वतीने राज्य समन्वयक व मी आज बैठकीला जाणार आहोत. समाजाच्या न्याय व हक्कासाठी कसलीही तडजोड नाही. असं देखील संभाजीराजे यांनी ठणकावले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!