औरंंगाबाद : शहराचे पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्या आदेशाने १ ते ३० जून या काळात शहरात ऑपरेशन मुस्कान-१० ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी शहराच्या विविध भागात शोध घेवून हरवलेल्या ७ मुलींचा शोध घेवून त्यांच्या आई-वडीलांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी दिली.
शहरातील विविध पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या जापु पथकातील अधिकारी व कर्मचा-यांचे पथक निर्माण करून ऑपरेशन मुस्कान-१० ही मोहिम शहरात राबविण्यात येत आहे. या मोहिमेत घरातून बेपत्ता झालेल्या १८ वर्षाखालील मुला-मुलींचा शोध पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, उपायुक्त मीना मकवाना, निकेश खाटमोडे, दीपक गि-हे यांच्या मार्गदर्शनाखाली जापु पथकातील अधिकारी व कर्मचारी घेत आहेत.
शहरात १ ते ३० जून या काळात ही मोहिम शहरभर राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या पहिल्या पंधरवाड्यात जापु पथकातील अधिकारी व कर्मचा-यांनी १८ वर्षाखालील हरवलेल्या ७ मुलींचा शोध घेवून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘अश्विन आणि जाडेजा या दोघांनाही खेळवावे’ : सुनील गावस्कर
- दोन आठवड्यात मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये उभा राहणार ऑक्सिजन प्लांट!
- ‘….तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावेच लागेल’
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

