Share

व्हायरल व्हिडीओच्या त्या ट्विटमुळे स्वरा भास्कर सापडली अडचणीत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने सोशल मीडीयावर केलेल्या एका ट्वीटमुळे ती अडचणीत आली आहे. उत्तर प्रदेशामधील गाझियाबादमध्ये एका वयस्कर व्यक्तीला झालेल्या मारहाणीच्या व्हायरल व्हिडीओवरून सध्या वाद निर्माण होत आहे. या वयस्कर व्यक्तीचा  व्हिडीओ कोणतीही शहानिशा न करता व्हायरल केल्याने तिच्यासह ट्विटर इंडियाचे प्रमुख मनीष माहेश्वरे यांच्यासह अन्य काही जणांवरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणामध्ये पत्रकार मोहम्मद झुबैर, राणा आयुब यांनी या प्रकरणासंदर्भात ट्विट केल्याने त्यांच्या नावाचाही एफआयआरमध्ये समावेश केला आहे. याशिवाय काँग्रेस नेते सलमान नाझमी, शमा मोहम्मद आणि मसकुर उस्मानी, लेखिका साबा नक्वी, द वायर ही कंपनी, ट्विटर आयएनसी आणि ट्विटर कम्युनिकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडविरोधात गुन्हा दाखल केला. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत या सर्वांनी या व्हिडीओची सत्यता न पडताळता व्हिडीओ व्हायरल करून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याच सांगितेले आहे.

काय आहे प्रकरण ?

व्हायरल व्हिडीओमधील वयस्कर व्यक्तीने अज्ञात लोकांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र ही वयस्कर व्यक्ती त्या लोकांना ओळखत होती. तसेच तिथे जबरदस्तीने जय श्री रामच्या घोषणा देण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही. पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार पीडित अब्दुल समद ५ जून रोजी बुलंदशहरमधून बेहटा (लोणी बॉर्डर) येथे आले होते.

या ठीकाणाहून अब्दुल समद एका अन्य व्यक्तीसोबत मुख्य आरोपी असणाऱ्या परवेश गुज्जरच्या बंथला (लोणी) येथील घरी गेले होते. त्यानंतर परवेशच्या घरी काही वेळात इतर मुलं आली. यामध्ये परवेशसोबत मिळून त्यांनी अब्दुल समद यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल समद हा तावीज बनावायचं काम करायचा. अब्दुल समदने बनवलेल्या एका तावीजचा कुटुंबावर उलट परिणाम झाल्याच्या रागातून त्यांना जाब विचारत मारहाण केल्याचे सांगितले गेले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!