नवी दिल्ली : आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जाणारा पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पत्रकार सुचेता दलाल चर्चेत होत्या. याचे कारण होते त्यांनी केलेले एक ट्वीट आणि त्यानंतर अदानी कंपनीचे कोसळलेले शेअर. तसेच टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्या एका ट्विटनंतर बिटकॉईनचे भाव वाढले तर काही कंपन्याचे शेअर वाढले.
असाच अनुभव कोका कोला कंपनीला आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोलाने केलेल्या कृतीचा कोका कोला कंपनीला फटका बसला आहे. फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोलाने एका पत्रकार परिषदेत कोका कोलाच्या दोन बाटल्या हटवल्या आणि या कृतीचा फटका कोका कोला कंपनीला बसला आणि कंपनीचे 30 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
युरो कपचा गतविजेता पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कोल्ड ड्रिंकच्या बाटल्या पाहून चिडला. त्याने आपल्या समोर कोको कोलाच्या बाटल्या पाहून नाराजी व्यक्त केली. रोनाल्डोने रागात म्हटले की, कोल्ड ड्रिंक नव्हे तर आपल्याला पाणी पिले पाहिजे असे त्याचे मत होते. परंतु रोनाल्डोच्या या २५ सेकंदाच्या कृतीनंतर कोका कोलाचे शेअर घसरण्यास सुरवात झाली. रोनाल्डोच्या या कृतीनंतर कोका कोलाचे अंदाजे 4 बिलियन डॉलर पर्यंत शेअर घसरले.
रोनाल्डोच्या या कृतीवर आता कोका कोला कंपनीनेही प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला आपल्याला काय प्यायचं हे ठरवण्याचा अधिकार आहे, कारण लोकांच्या आवडी आणि गरजा वेगळ्या असतात, असं कोका कोला कंपनीने सांगितलं आहे. युरो कप स्पर्धेच्या प्रवक्त्यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. खेळाडू पत्रकार परिषदेसाठी येतात तेव्हा त्यांच्यासाठी कोका कोला, कोका कोला झिरो श्युगर सोबतच पाणीही ठेवलेलं असतं, असं स्पर्धेचे प्रवक्ते म्हणाले.
हत्वाच्या बातम्या
- ‘अश्विन आणि जाडेजा या दोघांनाही खेळवावे’ : सुनील गावस्कर
- दोन आठवड्यात मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये उभा राहणार ऑक्सिजन प्लांट!
- ‘….तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावेच लागेल’
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण


