मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने जमीन घोटाळा केल्याच्या आरोपामुळे देशभरात खळबळ उडाली होती. याच मुद्यावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. त्यामुळे भाजप युवा मोर्चाच्या वतीने शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली.
भाजपने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढून निषेध करणार होते. भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकरी जमा झाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाच्या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरवातीला बाचाबाची झाली नंतर याच रुपांतर हाणामारीत झाले.
त्यानंतर यावरून आता जोरदार राजकारण तापायला सुरवात झाली आहे. ‘शिवसेनेला जशास तसे उत्तर देऊ असे म्हणणाऱ्या भाजपच्या सो कॉल्ड नेत्यांनी फक्त वेळ आणि तारीख सांगावी, आम्ही पुन्हा मैदानात येऊ’ असा थेट इशारा शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी भाजपला दिला आहे.
‘कोणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्या, असे सांगणाऱ्या स्व. बाळासाहेबांची ही शिवसेना आहे. राममंदिर हा प्रत्येक हिंदूच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पण त्याच्या जमिनीच्या खरेदीत झालेल्या घोटाळ्याची वृत्ते प्रसिद्ध झाल्याचा राग भाजपकडून शिवसेनेवर काढला जातो हे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचाच प्रकार आहे’ असाही टोला घाडी यांनी लगावला आहे
महत्वाच्या बातम्या
- व्हायरल व्हिडीओच्या त्या ट्विटमुळे स्वरा भास्कर सापडली अडचणीत
- ऑपरेशन मुस्कानमध्ये पोलिसांनी घेतला बेपत्ता झालेल्या ७ मुलींचा शोध
- शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आले आणि निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल – संजय राऊत
- डब्ल्युटीसी फायनल मध्ये अश्विन-जड्डुच्या खेळण्यावर मास्टर ब्लास्टरने दिले ‘हे’ उत्तर
- ठाकरे सरकारमध्ये चाललंय काय ? भुजबळ -राऊत झाले आक्रमक,भाजपला होणार फायदा ?


